Latur News:  Saamtv
महाराष्ट्र

Latur News: लातूर जिल्ह्यात बनावट खत विक्रीचा धंदा उघडकीस! कृषी विभागाची धाड; २६० पोती साठा जप्त

Latur News: लातूर जिल्ह्यातल्या चाकुर आणि सारोळा इथल्या माऊली कृषी सेवा केंद्र आणि जाधव कृषी सेवा केंद्र या दोन कृषी चालकांच्या गोडाऊन वर लातूर येथील कृषी विभागाच्या गुण नियंत्रक पथकाने छापा टाकला आहे.

Gangappa Pujari

संदिप भोसले,|ता. ११ जून २०२४

लातूर जिल्ह्यात बनावट खत विक्रीचा गोरख धंदा उघडकीस आला आहे. कृषी विभागाने रात्री उशिरा चाकूर आणि किनगाव इथे धाडी टाकल्या होत्या. या कारवाईत अंदाजे 4 लाख रुपयांचा 260 पोती बोगस खताचा साठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील चाकुर आणि सारोळा येथील माऊली कृषी सेवा केंद्र आणि जाधव कृषी सेवा केंद्र या दोन कृषी चालकांच्या गोडाऊनवर लातूर येथील कृषी विभागाच्या गुण नियंत्रक पथकाने छापा टाकला. यामध्ये 260 बोगस बनावट (डी.ए.पी) DAP खताचा साठा जप्त केला आहे. तर खरीप पेरणीच्या तोंडावर भेसळयुक्त बनावट खत शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

मात्र बनावट खताचा पुरवठा माऊली कृषी सेवा केंद्र आणि जाधव कृषी सेवा केंद्र या दोन कृषी सेवा केंद्राकडे कुठून आला? याचा तपास कृषी विभाग करत आहे. तर या दोन्ही कृषी सेवा चालकांवर खते बी-बियाणे अधिनियम कायदे अंतर्गतकिनगाव आणि चाकुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

दरम्यान, या भयंकर प्रकारामुळे जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी बोगस खताचा व बियाण्याचा साठा आहे याचा तपास कृषी विभाग घेत आहे, तर शेतकऱ्यांनी खत बियाणे घेते वेळेस त्याची रीतसर पावती घेणे गरजेचं आहे अस आव्हान देखील कृषी विभागाने केले आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT