Latur News
Latur News  Saam tv
महाराष्ट्र

Latur News : 'HIV'ग्रस्त मुलांच्या सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांच्याविरोधात 21 महिन्यांनी गुन्हा; काय आहे प्रकरण?

दीपक क्षीरसागर

Latur News : औसा पोलिसांत समाजसेवक रवी बापटले यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ महिन्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बत इतक्या वेळेनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे औसा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हासेगाव येथील एड्स ग्रस्त मुलाच्या सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांच्या विरोधात २१ महिन्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे. हासेगव येथील सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांनी सेवालया शेजारी असलेले भीमाशंकर बावगे यांची शेती ताब्यात घेण्यासाठी दबाव निर्माण करत असतात.

अनेकदा सेवालयातील मुलांना हल्ला करण्यासाठी पाठवत गत वर्षी मे २०२१ मध्ये असाच जीवघेणा हल्ला रवी बापटले आणि अन्य आठ साथीदारांनी कत्ती आणि अन्य प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला होता. याप्रकरणी औसा पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला नसल्याने अखेर औसा न्यायालयात दाद मागावी लागली.

सबळ पुरावा पाहून औसा न्यायालयाने रवी बापटले आणि अन्य आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज औसा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा करण्यात आला आहे.

कोण आहेत रवी बापटले?

रवी बापटले यांच्या गावात २००६ मध्ये एक जोडपे एड्स संक्रमणाने मरण पावले. त्या जोडप्याच्या चार वर्षांच्या मुलालाही एड्सची लागण झाली होती. नातेवाईकांनी त्या मुलाला एका पडक्या जागी टाकून दिले होते. ही बाब रवी यांना समजताच घटनास्थळी गेले.

त्या मुलाचे शरीर किड्या-मुंग्यांनी पोखरून टाकले होते. त्या मुलाचा रवी यांनी काही मित्रांना घेऊन अंत्यविधी केला. त्यानंतर रवी बापटले यांनी ‘एचआयव्ही’ग्रस्त अनाथ मुलांसाठी काम करायचे ठरवले. याच प्रेरणेतून आणि निर्धारातून ‘सेवालय’ची स्थापना केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

Benifits of Cereals: डाळ खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Tanvi Mundle : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Nana Patole On Opposition | एकेएक सगळेच विषय, नाना पटोलेंचा घणाघात!

SCROLL FOR NEXT