Latur Accident Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident : मित्राला बघायला जाताना काळाचा घाला, तिघांची अकाली एक्झिट, धक्क्याने आजारी मित्रानेही प्राण सोडला; लातूर हळहळलं

Latur News : लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मित्राला पाहण्यासाठी पुण्यावरून तिघे मित्र कारने लातूरकडे येण्यासाठी निघाले होते. मात्र या तिन्ही मित्राच्या कारला अपघात झाला आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : मित्र आजारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याने त्याला पाहण्यासाठी तिघे मित्र करणे निघणे होते. परंतु मित्राची भेट होण्यापूर्वीच त्या तिघा मित्रांवर काळाने घाला घातला. लातूर- टेंभुर्णी महामार्गावरील ढोकीजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे लातूरच्या कामखेडा गावावर शोककळा पसरली आहे. 

लातूर- टेंभुर्णी या महामार्गावर आज दुपारच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मित्राला पाहण्यासाठी पुण्यावरून तिघे मित्र कारने लातूरकडे येण्यासाठी निघाले होते. मात्र या तिन्ही मित्राच्या कारला अपघात झाला आहे. टेम्पो आणि कारच्या धडकेत तिघांचा जागेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर महामार्गावर बराचवेळ वाहतूक खोळंबली होती. 

त्या मित्राचाही मृत्यू 

दरम्यान आजारी मित्राला पाहण्यासाठी जात असताना तिघा मित्रांचा अपघाती मृत्यू झाला. तर दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आजारी मित्राला पाहण्यासाठी हे तिघे निघाले होते. त्या आजारी मित्राचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान हे चौघेही लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील रहिवासी होते. तर या धक्कादायक दुर्दैवी घटनेमुळे कामखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

दोन कारची भीषण धडक 

रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील खेड लवेल येथे दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाली. ओव्हरटेक करत असताना करताना अपघात झाला. या धडकेत एक कार रस्त्यावर पलटी झाली, तर दुसरी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावर आपटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT