Latif Khan Saam Tv
महाराष्ट्र

पाेलीस चाैकशीनंतर कॉंग्रेसचे नेते लतिफ खान यांचा मृत्यू; सक्करदरा पोलिसांनी फेटाळला मारहाणीचा आराेप

ताजबाग परिसरात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- मंगेश माेहिते

नागपूर (abu khan latest marathi news) : कुख्यात गुंड आबु उर्फ फिराेज खान यास मदत केल्याचा ठपका असलेल्या काॅंग्रेसचे नेते लतिफ खान (congress leader latif khan) यांचा नुकताच मृत्यू झाला. सक्करदरा पोलिसांनी (nagpur police) तपासाला बोलविल्यानंतर तपास आटोपून घरी आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे. यामुळे नागपूरात (nagpur) एकच खळबळ उडाली. दरम्यान खान यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला असून त्यांना तपासा दरम्यान कुठल्याही पद्धतीची मारहाण केली नसल्याचा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (congress leader latif babu passes away)

कुख्यात गुंड आबु खान याच्या जबाबावरून पोलिसांनी लतिफ खान याची चौकशी केली हाेती. या चाैकशीनंतर त्यांच्यावर तणावात आल्याने हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असा आरोप खान यांच्या फॅमिलीने केला आहे.

अबूने लतीफ यांच्याकडून १ लाख रुपये घेतल्याचे सांगितले. त्याबाबतच्या चौकशीसाठी सक्करदरा पोलिसांनी त्यांना ठाण्यात बोलाविले होते. पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांच्या उपस्थित ही चाैकशी झाली. चौकशीनंतर लतिफ घरी परतले. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे ताजबाग परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

SCROLL FOR NEXT