hingoli, abdul sattar saam tv
महाराष्ट्र

Hingoli Morcha News : कृषीमंत्र्यांनी भेट टाळली; माेर्चेकरी संतप्त, पाेलिसांचा साैम्य लाठीमार

यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला.

संदीप नागरे

Hingoli News : ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आज (शुक्रवार) हिंगोलीत काढण्यात आलेल्या माेर्चास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंसक वळण लागले. प्राथमिक माहितीनूसार कृषिमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) हे माेर्चकरी शेतकऱ्यांना न भेटता निघून गेल्याने आंदोलक संतप्त झाले. यावेळी आंदाेलकांना राेखण्यासाठी पाेलिसांना साैम्य लाठीमार करावा लागला. (hingoli latest marathi news)

कृषिमंत्री सत्तार हे आज हिंगोली दाै-यावर आले हाेते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियाेजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर ते नियाेजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आज शेतक-यांसह एनसीपीने हिंगोलीत (hingoli) आंदाेलन छेडले. (Maharashtra News)

हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आला. त्यावेळी पाेलिसांनी मुख्य प्रवेशद्वारासमाेर कडं केले. तसेच बॅरेकटस लावले. त्यामुळे आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जात येत नव्हते. आंदाेलकांनी संतापातून प्रवेशद्वारा ताेडले. परिणामी पोलिसांनी (police) लाठीचार्ज केला.

त्यामुळे आंदाेलक भडकले. आंदोलक आणि पाेलिसांत हमरीतुमरी झाली. पाेलिसांनी आंदाेलकांना शांततेचे आवाहन केले. परंतु काेणीही एेकण्याच्या मनस्थितीत नव्हते असे दिसून आले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

SCROLL FOR NEXT