Khandala Fire News Saam TV
महाराष्ट्र

Khandala Fire News: मोठी बातमी! खंडाळा घाटात टँकरला भीषण आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू , 3 जखमी

Mumbai - Pune Expressway News: या घटनेत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Ruchika Jadhav

Khandala Fire News: खंडाळा घाटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खंडाळा घाटात ऑइल टँकरला भीषण आग लागली आहे. या घटनेत एका महिलेसह अन्य तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही व्यक्ती जखमी झाल्याचे समजले आहे. आग इतकी भीषण आहे की, मुंबई-पुणे वाहतूक देखील ठप्प झाली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर टँकरला भीषण आग लागली आहे. या आगीत दोन व्यक्ती होरपळल्याची भीती आहे. एक्सप्रेस वेवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर ही घटना घडली आहे. दोन्ही बाजूची रहदारी सध्या थांबवण्यात आली असून आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

दुर्दैवाने यात 7 जण होरपळले आहेत. त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. खंडाळा (Khandala) घाटात झालेल्या या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Benefits : सकाळी की संध्याकाळी? अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

Pradeep Purnekar : ठाण्यात राजकीय वादातून ५ राऊंड फायर अन्.. आरोपी पप्प्याला बेड्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT