Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळापैकी एक म्हणजे चिखलदारा हिलस्टेशन आहे.
अमरावती जिल्ह्यात असलेल्या चिखलदारा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
समुद्रसपाटीपासून 1,088 मीटर उंचीवर वसलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि चिखलदारा हे ठिकाण आहे.
मोझरी पॉईंट हा चिखलदऱ्यातील प्रसिद्ध पॉईंट आहे.येथे गेल्यानंतर येथील खोल दऱ्या आणि सभोवतालचा हिरवागार निसर्ग पर्यटकांचे मन मोहून घेतो.
भीमकुंड महाभारताशी संबंधित असलेले हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. भीमने कीचकाचा वध केल्यानंतर या कुंडात स्नान केले होते असं म्हटलं जातं.
पंचबोल पॉईंट हा चिखलदऱ्यातील प्रसिद्ध पॉईंट आहे. इथे उभे राहून जोरात ओरडल्यास आवाज पाच वेळा घुमतो म्हणून पाच टेकड्यांच्या जोडणीमुळे याला 'पंचबोल' म्हणतात.
चिखलदऱ्याला लागूनच मेळघाटचे विस्तीर्ण जंगल पसरलेले आहे. येथे तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता, वाघ, बिबट्या, अस्वल आणि अनेक दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात.
वैराट पॉईंट हा चिखलदऱ्यातील सर्वात उंच पॉईंट मानला जातो. असे म्हटले जाते की हे राजा वैराटाचे राज्य होते. संध्याकाळी मावळतीचा सूर्य पाहण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते.