Manasvi Choudhary
सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भागात विविध परंपरा आजही जपल्या जातात.
आजही अनेक भागात लग्नात जेवणात विशिष्ट भाजी प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी मटकीची भाजी ही लग्नात बनवली जाते.
वरण भात यासोबत केलेली जाणारी मटकीची झणझणीत भाजी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.
मात्र अनेकदा घरी मटकीची भाजी बनवल्यानंतर लग्नात बनते तशी चव येत नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला मटकीच्या भाजीच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
मटकीची भाजी बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरे, लसूण, मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर हे साहित्य घ्या.
सर्वातआधी तुम्ही भाजीसाठी मसाला बनवून घ्या मसाला बनवण्यासाठी सुके खोबरे, धने, जिरे, कांदा, भाजून घ्या. मिश्रण भाजल्यानंतर त्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून शिजवनून घेऊ शकता किंवा डायरेक्ट भाजी बनवू शकता.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून तो मऊ आणि हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर टोमॅटो मिक्स करून शिजवा.
टोमॅटो शिजल्यावर गॅस बारीक करा आणि त्यात हळद, कांदा-लसूण मसाला आणि गरम मसाला घालून मसाले तेलात चांगले परतून घ्या. मसाला चांगला भाजल्यावर त्यात मोड आलेली मटकी घाला मिश्रण चांगले एकजीव करा. म्हणजे मटकीची भाजी झणझणीत तयार होईल.
नंतर भाजीवर झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्या म्हणजे झणझणीत तर्रीदार मटकीची भाजी घरच्याघरी तयार होईल.