Surabhi Jayashree Jagdish
फोन सतत हँग होत असेल तर तो स्विच ऑफ करून पुन्हा सुरू करा. यामुळे फोनची तात्पुरती समस्या दूर होण्यास मदत होते. अनेकदा साध्या रीस्टार्टमुळेही फोन पूर्वीसारखा व्यवस्थित चालू लागतो.
मोबाइलमध्ये खूप जास्त अॅप्स असल्यास फोन स्लो होऊ शकतो. ज्या अॅप्सचा वापर होत नाही, ते लगेच डिलीट करणे फायद्याचे ठरतं. यामुळे फोनची स्टोरेज आणि RAM दोन्ही फ्री राहतात.
अनावश्यक फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स फोनमध्ये साठल्याने हँगिंगची समस्या वाढते. वेळोवेळी फोनमधील कचरा फाइल्स डिलीट करणे गरजेचे आहे. मोकळी स्टोरेज असल्यास फोन अधिक वेगाने काम करतो.
सर्व उपाय करूनही फोन हँग होत असेल तर फॅक्टरी रिसेटचा पर्याय वापरू शकता. यामुळे फोनमधील सॉफ्टवेअर समस्या दूर होण्यास मदत मिळते. मात्र रिसेट करण्यापूर्वी महत्त्वाचा डेटा बॅकअप घ्यायला विसरू नका.
फोनचे सॉफ्टवेअर जुनं असल्यासही परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. कंपनीकडून येणारे नवीन अपडेट्स वेळेवर इंस्टॉल करणं आवश्यक आहे. यामुळे फोन अधिक सुरक्षित आणि स्मूथ चालतो.
फोन जास्त गरम झाल्यास त्याचा वेग कमी होऊ शकतो. दीर्घकाळ गेम खेळणं किंवा सतत वापर केल्याने ओव्हरहिटिंग होते. त्यामुळे फोनला वेळोवेळी विश्रांती देणं महत्त्वाचं आहे.
जुने किंवा खराब मेमरी कार्ड फोन हँग होण्याचं कारण ठरू शकते. कधी-कधी स्लो मेमरी कार्डमुळे फोनची गती कमी होते. अशावेळी मेमरी कार्ड बदलणं किंवा काढून तपासणं फायदेशीर ठरतं.