Nitin Gadkari  saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari News: उत्तर प्रदेशचे रस्ते २०२४ पूर्वी अमेरिकेच्या रस्त्यांहून चांगले असतील; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

Political News: अमेरिकेपक्षाची उत्तम रस्ते मिळतील असं आश्वासन नितीन गडकरी यांनी केलं आहे.

Ruchika Jadhav

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशच्या नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात रस्त्यांची योग्य सुविधा उपलब्ध्द नाही. येथील नागरिकांना रस्ते नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात या सर्व नागरिकांसाठी नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेपेक्षाची उत्तम रस्ते मिळतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. (Latest Political News)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडलेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे "उत्तर प्रदेशचे रस्ते २०२४ पूर्वी अमेरिकेच्या रस्त्यांहून चांगले असतील", अशा शब्दांत नितीन गडकरींनी जनतेने आश्वासन दिलं आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी

२०२४ पूर्वी लॉजिस्टिक कॉस्ट ही एकेरी आकड्यात असेल. आत्ता आपली लॉजिस्टिक कॉस्ट ही १६ टक्के आहे अमेरिका (America) व युरोपियन देशांमध्ये तीच १२ टक्के व चीनमध्ये ८ टक्के आहे. आपण ९ टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामुळे निर्यात वाढण्यास मदत होईल. उत्तर प्रदेशचे रस्ते २०२४ पूर्वी अमेरिकेच्या रस्त्यांहून चांगले असतील, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

तसेच पुढे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही देशाला नवा आर्थिक विचार दिला आहे. आर्थिक विचार हा देशाच्या अर्थव्यवस्थेला दुप्पट करतो. ६० वर्ष काँग्रेसला झाली, त्यांच्या विचारांवर जे काही झालं नाही ते या मोदींजींच्या काळात झालं. त्याचं श्रेय जनतेला जातं, असं म्हणत नितीन गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची आठवण करुन दिली आहे.

हा तर फक्त ट्रेलर आहे

जनतेने जो काही बदल केलाय त्यामुळे आम्ही आलोय. जो काही बदल दिसतोय तो तर फक्त ट्रेलर आहे. खरा सिनेमा तर आता सुरु होणार आहे. असं त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच राजकारणातून सन्यास घेण्याच्या बातम्यांना नितीन गडकरींनी पूर्णविराम दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे आरोपपत्राशिवाय ३ महिन्यांपेक्षा जास्त निलंबन नको; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Women's Reservation Bill: महिला आरक्षणासाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन! लोकसभेच्या जागा ५४३ वरून थेट ८५० होणार? विशेष अधिवेशनात काय घडणार?

Pune Crime: पुण्यात किरकोळ कारणावरून वाद, तरुणाची भररस्त्यात हत्या; ८ जणांना जन्मठेप

Weather Update: थंडी गायब, पावसाचा धुमाकूळ सुरूच; १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज; ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहणार

Friday Horoscope : शुक्रवारी ५ राशींचं नशीब चमकणार! कन्या राशीला घर-गाडीचा योग, 'या' राशींचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT