Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊतांना ते आवाहन महागात पडलं; नाशकात गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत सोनावणे

Political News: खासदार संजय राऊत सातत्याने आपल्या भाषणातून विरोधकांवर खरमरीत टीका करतात. प्रत्येकाला ते आपल्या शैलीत उत्तरे देतात. अशात राज्य सरकारविरोधात केलेलं एक वक्तव्य खासदार संजय राऊतांना चांगलच महागात पडलं आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

नाशकात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. काही दिवसांआधीच सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यावर सर्वच नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच शिंदे ठाकरे असे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. संजय राऊतांनी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, असं आवाहन संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे या वक्तव्यावरून संजय राऊतांवर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT