Nashik Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकमधील काही गावांना गुजरातमध्ये सामील व्हायचंय; नेमकी अडचण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी गावकऱ्यांसह ही मागणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न ताजा असताना आता नवं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नाशिकमधील (Nashik) काही गावांनी आता गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही ठिकाणच्या विकासात सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं अधोरेखित झालं आहे.

नाशिकमधल्या काही गावच्या ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील काही आदिवासी पाडे आणि गावातील लोकांनी सुरगणाचे तहसीलदारांना याबाबचे निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी गावकऱ्यांसह ही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सुरगणा तालुक्यातील कोणत्या गावांनी ही मागणी केली आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या दुर्गम भागातील नागरिकांना स्वातंत्र्यानंतरही मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. वीज, पाणी आणि शिक्षण यासाठी अजूनही येथील नागरिकांना झगडावं लागतंय. सरकारं बदलतात परंतु या भागातील लोकांचे मुलभूत प्रश्न सुटत नाहीत.

पाण्यासाठी येथील लोकांना दूरदूर भटकंती करावी लागते. वैद्यकीय सोयी जवळपास उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी गावाचा समावेश गुजरातमध्ये करावा, अशी मागणी केली आहे.

सोलापुरातील १८ गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगांव, मुंडेवाडी, कुमठे, केगांव बु., केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ इत्यादी गावं हे कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. गावात रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याने गावकऱ्यांनी ही इच्छा व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT