Video : बेळगाव राज्याचा झेंडा घेऊन नाचल्याने मोठा राडा; महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण

बेळगाव येथील एका महाविद्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Belgaum News
Belgaum News Saam tv
Published On

रणजीत माजगांवकर

Belgaum News : बेळगावात सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. याचदरम्यान बेळगाव येथील एका महाविद्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महाविद्यालयातील कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने बेळगाव राज्याचा झेंडा काढून नाचल्याने त्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

बेळगाव येथील एका महाविद्यालयातील कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने बेळगाव राज्याचा झेंडा काढून नाचल्याने त्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बेळगाव राज्याचा झेंडा काढून नाचवल्याने तिथे उपस्थित विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याला मारहाण केलेली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेळगावातील काही कन्नड संघटनांनी त्याला विरोध दर्शवला. तसेच विद्यार्थ्याला केल्याला मारहाणीचा निषेध करण्यासाठी बेळगावतील काही कन्नड संघटना विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरल्या.

कन्नड संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महाविद्यालयासमोरच टार्यस जाळून निषेध व्यक्त केला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्याचा झेंडा हा महाविद्यालयाचा गेटवर, पोलीसांच्या वाहनावर लावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. या संपूर्ण घटनेमुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Belgaum News
Nashik News: नाशिकमधील काही गावांना गुजरातमध्ये सामील व्हायचंय; नेमकी अडचण काय?

कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला डिवचलं

सांगलीतील जत तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी सोडून कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलं आहे. कर्नाटक सरकारकडून जतच्या तिकुंडी भाागात पाणी सोडण्यात आले आहे. कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडलं आहे. आधी कर्नाटक मध्ये येण्याचे निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावात पाणी सोडलं आहे. एक दिवसात तिकुंडी येथील साठवण तलाव कर्नाटकच्या सोडलेल्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com