Nagpur news: 'ही वादळापुर्वीची शांतता'  Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur news: 'ही वादळापुर्वीची शांतता'

गंगा जमुना वसाहत सील केल्यानंतर तेथील सामाजिक सील केल्यानंतर तेथील काही सामाजिक संघटनांनी याला विरोध केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : पोलिस आयुक्त अमितेश कुमार ( Amitesh Kumar) यांनी काल नागपूरमधील (Nagpur) रेड लाइट एरिया (Red Light Area) गंगा जमुना वसाहत (Ganga Jamuna Vasahat) सील करत त्याभागात जमानबंदीचा आदेश लागू केला. याप्रकरणी काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे (Jwala Dhote) यांनी वारांगना शांत आहेत पण ही शांतता वादळापूर्वीची आहे हे लक्षात ठेवा असा इशारा नागपूर प्रशासनाला दिला आहे.

दरम्यान, प्रशासनाला आमचे पुनर्वसन करायचे असेल तर आमचं लग्न सरकारी नोकरीत असलेल्यांशी लावून द्या, आमच्या मुलांना वडील म्हणून त्या व्यक्तीचे नाव लावता यावे, अशी मागणी गंगा जमुना वसाहतीतील काही महिलांनी केली आहे.

हे देखील पहा

नागपूर शहरातील कूप्रसिद्ध यांची वस्ती गंगा जमुना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तर 144 कलम देखील लागू करण्यात आला आहे. तेव्हापासून येथील देह विक्री व्यवसाय थांबला आहे. ही वसाहत येथून हटवावी अशी परिसरातील लोकांची मागणी आहे. तर अनेक सामाजिक संघटनांनी ही दोनशे वर्षे जुनी वसाहत असल्याने ती हटवू नये. या महिलांना बेघर करू नये असा देखील पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ती विविध सामाजिक संघटनांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलनाच्या नेत्या यांनी दोनदा आंदोलन केली होती. पण तरी देखील वस्ती सील आहे. त्यामुळे धोटे यांनी इशारा दिला आहे की आता जी शांतता या वस्तीत दिसत आहे ती वादळापूर्वीची शांतता आहे.

तसेच, मुधोजी राजे भोसले हेदेखील पत्र परिषदेमध्ये उपस्थित होते. त्यांनीदेखील आपण या महिलांसोबत असल्याचे म्हटले आहे. ही वसाहत सतराव्या शतकापासून आहे. लोकांनी नंतर येथे घर बांधली. येथील जगन्नाथाचे मंदिर खंडोजी भोसले यांच्या सांगण्यावरून देवाजी पंत चोरघडे यांनी वसाहतीतील महिलांना बांधून दिले. त्यामुळे महिलांना येथे सन्मानाने राहू द्यावे आणि ज्याला पटत नसेल त्यांनी तेथून निघून जावे, असा इशारा मुधोजी राजे भोसले यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT