Nashik Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident News: धावत्या रेल्वेत पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; प्रवासात नेमकं काय घडलं?

गोविंद पासवान आणि सुमन पासवान अशी या दाम्पत्याची नावे आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

Nashik News: नाशिकमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. एका ५ महिन्याच्या चिमुकल्याचा धावत्या रेल्वेमध्येच मृत्यू झाला आहे. बाळाच्या निधनामुळे संपूर्ण प्रवाशांना अश्रू अनावर झालेत. (Latest Nashik News)

पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वेने एक दाम्पत्य आपल्या बाळाला घेऊन लखनऊ ते पुणे प्रवास करत होते. गोविंद पासवान आणि सुमन पासवान अशी या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांच्या पाच महिन्याच्या गोंडस बाळाचा प्रवासात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

या बाळाला ताप आलेला होता आणि त्याची हालचाल बंद झाली होती. गाडी मनमाड रेल्वे स्थानकात आल्यावर आपले मूल गेल्याचे समजताच आईने हंबरडा फोडला. मृत मुलाला छातीला लावून आई व बाळाचे वडील धायमोकळून रडत होती. हृदय पिळवून टाकणाऱ्या या प्रसंगांने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.ही घटना समाजात मनमाडच्या मिलींद सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यानी पासवान कुटूंबियांना धीर देत या बालकाचा मनमाड येथे दफनविधी करून माणुसकीचे दर्शन घडविले.

पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी विरार रेल्वे स्थानकातूनही अशीच एक घटना समोर आली होती. विरार रेल्वे स्थानकात एका कुटुंबाचा अपघात झाला होता. या अपघातात कुटुंबातील तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. विरारमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये एक पुरुष, महिला व तीन महिन्यांचा बाळाचा जागीच मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT