Gautami Patil Program Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil Program: गौतमीचा कार्यक्रम पडला महागात; आयोजकावर गुन्हा दाखल

सोलापूरात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करणं एका व्यक्तीला चांगलच महागात पडलं आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News: सबसे कातील गौतमी पाटील तिच्या नृत्याने भलतीच चर्चेत आली आहे. गौतमीने फार कमी वेळेत प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे. सध्या प्रत्येक गावागावात गौतमीचा कार्यक्रम होत असतो. अशात गौतमी आपल्या गावात येणार म्हटल्यावर कार्यक्रमाची जय्यद तयारी सुरू होते. सोलापूरात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करणं एका व्यक्तीला चांगलच महागात पडलं आहे. (Latest Gutami News)

गौतमी म्हटल्यावर कार्यक्रमात राडा आणि गोंधळ होण्याच्या घटना फार वाढल्या आहेत. त्यामुळे रात्री १० नंतर पोलिसांकडून खबरदारी घेत शो बंद केले जात आहेत. त्यामुळे वेळेची मर्यादा पाळतच गौतमीला तिचे कार्यक्रम करावे लागतात. अशात वेळ न पाळणे एका व्यक्तीच्या चांगलच अंगलट आलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शीमध्ये सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने शुक्रवारी गौतमी पाटीलच्या शोचे आयोजन केले होते. हा शो संध्याकाळी सात वाजता सुरु होणार होता. त्यासाठी शो सुरु होण्यापूर्वी सहा वाजताच मोठ्यासंख्येने सर्वांनी गर्दी केली होती. या शोसाठी अनेकांनी तिकीट काढून हजेरी लावली होती. पण शो वेळेवर सुरु झाला नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास शो सुरु झाला. कारण गौतमी पाटीलच या शोच्या ठिकाणी उशिरा पोहचली. त्यामुळे या कार्यक्रमासाठी सहा वाजल्यापासून येऊन बसलेले सर्वजण कंटाळले.

अशामध्ये गौतमी पाटीलने (Gautami Patil) स्टेजवर ढासू एन्ट्री मारली. शोसाठी हजेरी लावलेल्या सर्वांनी शिट्यांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला. एका गाण्यावर गौतमी पाटीलनेने जबरदस्त डान्स केला. त्यानंतर पोलिसांनी तिचा शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतर गौतमीचा शो सुरु असल्यामुळे बार्शी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, गोंधळ होऊ नये यासाठी हा शो बंद पाडला.

राजेंद्र गायकवाड यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे आयोजकांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमोल वाडकर यांच्या फिर्यादीवरून आयोजक राजेंद्र गायकवाडवर बार्शी (Barshi) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT