Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकला
Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकला Saam TV
महाराष्ट्र

Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकला

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालना शहरामधील एका 25 वर्षाच्या फळविक्री करणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवाय हत्येनंतर आरोपींनी फळविक्रेत्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा घटना आज सकाळी उघडकीस आली असून भरत मुजमुले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शहरातील डबलजीन भागात ही घटना घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी आज भल्या पहाटे ही हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, फळविक्री करणाऱ्या तरुणाची अज्ञाताने हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना (Jalna) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या हत्येमागील कारण अजून अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Sqaud: BCCI कडून मोठी चूक? टीम इंडियात निवड झालेल्या हे 2 खेळाडू IPL 2024 स्पर्धेत सुपरफ्लॉप

Today's Marathi News Live : ठरलं! भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार

Benifits of Walnuts in Summer: उन्हाळ्यात अक्रोड खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?

Online Ration Card : घरबसल्या बनवा तुमचं रेशन कार्ड; कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Agriculture News : उन्हाळी मुगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT