Online Ration Card : घरबसल्या बनवा तुमचं रेशन कार्ड; कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Apply For Online Ration Card : विविध कामांमध्ये देखील काहीवेळा रेशन कार्ड मागितले जाते. त्यामुळे आज रेशन कार्ड काढण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेऊ.
Online Ration Card
Online Ration CardSaam TV

प्रत्येक गरजू आणि गरीब कुटुंबाकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रात याच रेशन कार्डमार्फत गरीब व्यक्तींना अन्न-धान्य दिले जाते. शासनाच्या विविध योजनांपैकी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत धान्य मिळवता येतं. तसेच विविध कामांमध्ये देखील काहीवेळा रेशन कार्ड मागितले जाते. त्यामुळे आज रेशन कार्ड काढण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेऊ.

Online Ration Card
Free Ration Scheme: पुढील 5 वर्षे 80 कोटी लोकांना मिळणार मोफत रेशन, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

घरबसल्या मिळवा रेशन कार्ड

अनेकदा शैक्षणिक कामांसाठी उत्पन्नाचा दाखल मागितला जातो. उत्पन्नाचा दाखला काढताना रेशन कार्ड विचारले जाते. तसेच महाविद्यालयात स्कॉलशीप किंवा अन्य काही योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड विचारले जाते. पूर्वी रेशन कार्ड काढण्यासाठी रेशन ऑफिसच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. मात्र आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या तुमचं रेशन कार्ड मिळवू शकता.

असं करा ऑनलाईन अप्लाय

रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

mahafood।gov।in या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी लॉगइन करून घ्यावे लागेल.

पुढे Apply online for ration card वर क्लिक करा.

आयडी प्रुफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी गोष्टी रेशन कार्ड बनवण्यासाठी विचारल्या जाऊ शकतात.

विचारलेली सर्व माहिती आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल.

फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य ठरल्यास, तुमचं रेशन कार्ड तयार होईल.

रेशन कार्डसाठी शुल्क

शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करणाऱ्या व्यक्तींकड रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठीचं शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत ठेवण्यात आलं आहे.

या व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतात

रेशन कार्डसाठी अप्लाय करण्याकरता तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे टाकताना त्यात १८ वर्षांखालील कमी वयोगटातील मुलांची नावे टाकता येतात. १८ वर्षांनंतर प्रत्येक व्यक्ती वेगळ्या रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकतो.

Online Ration Card
Ration Shop : रेशन सोबत दिलेल्या साड्या महिलांनी केल्या परत; जव्हार तहसीलमध्ये धडक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com