धक्कादायक : 17 वर्षाच्या मुलीवरती आळीपाळीने सामूहिक बलात्कार; 7 जण ताब्यात, 10 फरार SaamTV
महाराष्ट्र

धक्कादायक : 17 वर्षाच्या मुलीवरती आळीपाळीने सामूहिक बलात्कार; 7 जण ताब्यात, 10 फरार

धमकी देत17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्काराची अमानुष घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 7 ते 8 जणांना वडखळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील आणखी अंदाजे 10 ते 12 जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर -

रायगड : पेण तालुक्यातील (Pen Taluka) वाशी परिसरात धमकी देत 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्काराची अमानुष घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 7 ते 8 जणांना वडखळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील आणखी अंदाजे 10 ते 12 जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. सदर नराधमांनी या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेण तालुक्यातील वाशी (Vashi) परिसरात एका हळदीसमारंभात पीडित तरुणीची ओळख दोन तरुणांसोबत झाली होती. या ओळखीचे रुपांतर काहीच दिवसात प्रेमात झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारिरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनीही धमकावत त्या तरुणीवर बलात्कार केला.

दरम्यान या प्रकरणात सुमारे 20 हून अधिक जण सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. वडखळ पोलिस ठाण्यात याबाबतगुन्हा दाखल करण्यात आला असून 7 ते 8 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर आणखी 10 ते 12 जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणाचा तपास अलिबाग पोलिस (Alibag Police) उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे नुकसान

Shocking: क्षणात सर्वकाही संपलं! पिस्तूल छातीवर लावलं अन् ट्रिगर ओढला, रीलच्या नादात तरुणाने गमावला जीव; थरारक VIDEO

Summer Vacation In Satara : मनाला भुरळ घालणारे साताऱ्यातील हिल स्टेशन, कडाक्याच्या उन्हात 'येथे' मिळेल थंडगार हवा

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT