Sakshi Sunil Jadhav
चेहऱ्यावर बारीक केस येणं हे नॉर्मल आहे. पण काही महिलांना ते केस काढून चेहरा क्लीन आणि स्मूद करायचा असतो.
महिला चेहऱ्यावरचे बारीक केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन waxing चा पर्याय निवडतात. पण त्याने चेहऱ्यावर इजा होण्याची शक्यता आहे.
तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीने चहऱ्यावरचे केस काढायचे असतील तर पुढील सोपी पद्धत तुम्ही फॉलो करा.
घरगुती उपायाने तुम्हाला जास्त दुखापत होणार नाही. शिवाय कोणत्याही केमिकलयुक्त प्रोडक्टचाही वापर तुम्ही यात करत नाही. त्यामुळे स्किन नॅचरली सुंदर दिसते.
२ चमचे गव्हाचं पीठ, २ चमचे बेसन, १ चमचा साखर, गरम पाणी इ.
तवा गरम करून गव्हाचं आणि बेसन पीठ सोनेरी रंग होईपर्यंत भाजा. मग ते थंड करून घ्या.
आता गरम कोमट पाण्यात साखर वितळवून घ्या. मग त्यात पीठ मिक्स करून पेस्ट तयार करा.
पेस्ट चेहऱ्याला किंवा जिथे बारीक केस असतील त्या भागावर लावून घ्या. त्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मग ते सुकल्यावर हळूवारपणे गोलाकारात काढून टाका.