Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime News: धक्कादायक! त्याने तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले; मग व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार

Crime News: सदर घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना दिली असून पोलिस या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जयेश गावंडे

Akola News: अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका महिलेचे अक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना दिली असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात पीडितेचे अश्लील फोटो काढण्यात आले होते. फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडून पैसे उकळून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या छळाला कंटाळून ३४ वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

अकोला (Akola) शहरातील पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार २०२० पासून ती साडी वर्कचे काम करते. त्यासाठी चौकीदार म्हणून काम करणारा आरोपी कैलास याने तिचे चोरून काही फोटो, व्हिडीओ काढले. त्यानंतर त्याने पीडितेकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने त्याला सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर कैलास धाबे हा पैशांची मागणी करत होता. तिच्याकडे पैसे नसल्याने, आरोपीने बळजबरीने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतरसुद्धा तो वारंवार लैंगिक अत्याचार करायचा. त्यावेळीसुद्धा त्याने फोटो काढले आणि ते प्रसारित करण्याची धमकी देत होता. अखेर महिलेने सिव्हिल लाइन पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ही घटना घडत होती. महिलेने यातून स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिला मारहाण केली. तसेच अत्याचार करताना देखील तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले गेले. फोटो व्हायरल केल्यास समाजात आपलं नाव खराब होणार याची महिलेला भीती होती. तसेच सुरु असलेल्या अत्याचारामुळे ती रोज मरण यातना भोगत होती. त्यामुळे तिने विष घेत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. महिलेने विष घेतल्यावर तात्काळ शेजारील व्यक्तींनी तिला रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलीस तपासात ही घटना उघड झाली आहे. सध्या महिला सुखरुप असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात ७ आरोपींच्या घराची झडती, पोलिसांना ड्रग्ज सापडलं नाही, मोबाईल-लॅपटॉप जप्त

पती स्नॅक्स आणायला विसरला आणि पत्नीने केला चाकूहल्ला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

Fact Check: सतत नोकरी बदलताय? तर भरावा लागणार लाखो रुपयांचा दंड; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

SCROLL FOR NEXT