Samruddhi Mahamarg Accident  Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांचा घाबरवणारी आकडेवारी समोर; ७ महिन्यात ७२९ अपघात, मृतांचा आकडाही मोठा

Accident News : वाहनांचा वेग हा समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचं प्रमुख कारण आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात चिंतेचा विषय आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहनांचा वेग हा समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचं प्रमुख कारण आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी वेगाला आवरा अशी स्थिती निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गावर डिसेंबर ते जुलैदरम्यान ७२९ अपघातांची नोंद आहे. अपघातात आतापर्यंत १०१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर २६२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News)

चालकाला येणारा थकवा, गाडी चालवताना लागणारी डुलकी आणि कमाल वेग मर्यादेचे उल्लंघन ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. तसेच वाहनांचे टायर फुटून देखील अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. यासाठी प्रशासनाने महामार्गावर गाड्यांना टायर चेक करुन सोडण्याची मोहीम देखील सुरु केली आहे.  (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक ४५१ लहान मोठे अपघात नागपूर विभागात झाले आहेत. टायर फुटून १०९, चालकाला डुलकी अथवा थकवा आल्यानं २४२ तर ओव्हरस्पीडींगमुळे  १२८ अपघात झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

SCROLL FOR NEXT