Latue News  Saam TV
महाराष्ट्र

लातूर शहरात उभारला जातोय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा पुतळा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात येते.

दीपक क्षीरसागर

लातूर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात येते. यानिमित्ताने लातूर शहरात देखील जयंतीच्या निमित्ताने आंबेडकरी अनुयायांनी जोरदार तयारी सुरु केली असून यामध्ये लातूरच्या खासदारांनी विशेष भर टाकली आहे. शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) पार्क याठिकाणी बाबासाहेबांच्या ७० फूट उंचीच्या पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली असून दिवसरात्र हे काम सुरु आहे. १३ एप्रिल पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

स्टॅचू ऑफ नॉलेज या नावानं हा पुतळा तयार करण्यात येत आहे. या पुतळ्याचं अनावरण १३ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तर १४ एप्रिल म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्यासह परिसरात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांचे सुपुत्र शंकर शृंगारे यांनी दिली आहे. फायबर, प्लास्टिक आणि प्लास्टर याचा वापर करून तयार करण्यात येत असलेली हि मूर्ती राज्यात पहिलीच आहे हे विशेष आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT