Landslide at Ganesh Khind near Sangli Saam Digital
महाराष्ट्र

Sangli Ganeshkhind Landslide: गणेश खिंडीत दरडी काेसळण्याच्या घटना, सांगली प्रशासन उपाययाेजना कधी करणार?

Landslide at Ganesh Khind near Sangli: सांगली जिल्हा प्रशासनाने गणेश खिंड बाबतच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत घाटातील धोकादायक दगड काढून घ्यावे अशी मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे.

विजय पाटील

सांगली नजकीच्या गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने सुरू आहेत. या घटनांकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान दरड काेसळण्याच्या घटनांमुळे प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण हाेऊ शकताे. तरी प्रवाशांनी काळजीपूर्वक प्रवास करणे गरजेचे बनले आहे.

सांगलीच्या कडेगाव आणि वाळवा तालुक्याला जोडणाऱ्या गणेश खिंड या अतिवळणाच्या घाटात गेल्या 15 दिवसात 3 वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही प्रवाशांसाठी हा धोक्याचा घाट बनल्याचे सध्याचे चित्र आहे.

गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, क-हाड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये -जा करत असतात. हा रहदारीचा घाट असल्यामुळे या घाटाची सुरक्षा महत्वाची आहे. या घाटात अतिउंच दगडाच्या कडा आहे.

दगडाच्या शिळा प्रशासनाने काढाव्यात

उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की या कडांना पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी साठते व भल्या मोठ्या दगडाच्या शिळा वेगाने रस्त्यावर येतात. या घटना नेहमीच घडत असतात मात्र पावसाळ्यापूर्वी या धोकादायक दगडाच्या शिळा प्रशासनाने काढून घेणे महत्त्वाचे असते. अद्याप तरी प्रशासनाने याबाबत काहीच हालचाली केल्या नसल्याने प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमधील सकल मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT