Shirur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: ...तर जिवंत ठेवणार नाही, शिरूरमध्ये जमिनीसाठी महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; पाहा VIDEO

Crime Viral Video: शिरूरमध्ये जमिनीच्या वादातून महिलांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

रोहिदास गाडगे, शिरूर

शिरूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या वादातून हाणामारी होत असलेल्या अनेक घटना समोर येत आहे. जीवे मारण्याच्या धमकीपासून ते मारहाणीचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशात शिरूरमध्ये जमिनीच्या वादातून आणखी एक हाणामारीची घटना घडली. जमिनीच्या वादातून महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात जमिनीच्या वादातून महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. 'आमच्या बापाच्या शेतात आलात तर जिवंत ठेवणार नाही.' असं म्हणत महिलांनी महिलांना खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली. शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वादातून महिलांनीच महिलांवर जिवघेणा हल्ला केला.

साधना देशमुख यांच्यासह ३ महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. त्रिंबक हिंगे आणि शंकर देशमुख यांचाही मारहाण करण्यात आली. शेतातून तोडलेले कडवळ घेऊन जात असताना 7 जणांनी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी गज, लाकडी काठी, लाथा-बुक्क्यांनी या सर्वांना जबर मारहाण करण्यात आली.

शेताच्या कडेला असलेल्या शेतात आणि शेताच्या बांधावर या सर्व महिलांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाल्या आहेत. कुणाचे दात पाडले तर कुणाला अंगाला चावा घेण्यात आला. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांनीच कायदा हातात घेतल्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला ३ वर्षे होऊनही मूल होत नाही, नवरा बायकोला घेऊन मांत्रिकाकडे गेला; शेतात नेऊन केला बलात्कार

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी भरवली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा

Meta कडून 1 कोटी Facebook अकाउंट ब्लॉक; यात तुमचा तर अकाउंट नाही ना? का केली कारवाई?

Ambenali Ghat Closed : आंबेनळी घाटातील वाहतुकीवर १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध, दरड कोसळण्याचा धोका

Fact Check: दारू 50 टक्क्यांनी महागणार? मद्यपींच्या खिशाला मोठी कात्री? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT