राज्यभरात गाजणाऱ्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरण प्रचंड गाजत आहे. या प्रकरणात नव-नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील ड्रग्जमाफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मैत्रिणींनी ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपी ललित पाटीलला 'ससून'मधून पळून जाण्यास मदत करणाऱ्या या मैत्रिणींची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत आता धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. ललित पाटीलला पळून जाण्यास त्याच्या मैत्रिणींनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोन्ही महिलांची नावे आहेत. नाशिक पोलिसांनी त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विशेष म्हणजे यापैकी अर्चना निकमनं पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. पुण्याहून पळल्यानंतर ललित पाटीलने अर्चना निकमकडे १ दिवस वास्तव्य केलं. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने अर्चनाकडे दिलेले रोख २५ लाख रुपये अर्चनाने ललित पाटीलला दिले.
याच पैशांच्या मदतीने ललित पाटील सुरुवातीला इंदूरला पळून गेला. यानंतर त्याचा तिथून नेपाळला पळून जाण्याचा प्लान होता. मात्र, भाऊ भूषण पाटीलला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला माघारी फिरावं लागलं. त्यानंतर चेन्नईमार्गे श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
अर्चना निकम ही ललित पाटील याचा मित्र किरण निकम याची पत्नी आहे. काही वर्षांपूर्वी किरण निकम याची हत्या करण्यात आली होती. ललित ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर नाशिकमध्ये आला. त्याने १ दिवस अर्चना निकमकडे वास्तव्य केलं.
भूषण पाटीलने अर्चनाकडे दिलेली २५ लाखांची रोकड अर्चनाने ललित पाटीलला दिली. ललित याच पैशांच्या मदतीने देशाबाहेर पळून जाण्याचा प्लान होता. नाशिक पोलिसांनी अर्चना निकमकडून ललित पाटीलने ठेवण्यासाठी दिलेली ७ किलो चांदी देखील जप्त केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नाशिकहून पुढे पळाल्यानंतर देखील ललित पाटील हा अर्चना निकमच्या संपर्कात होता. सगळ्या अपडेट्स व्हॉट्सॲप कॉलवरून घेत होता. इतरांच्या मोबाईल नेटवर्कचा वापर करून ललित पाटील हा अर्चना निकमच्या संपर्कात असल्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा शोधणे पोलिसांना काहीसं अवघड जात होतं.
मात्र, अखेर अशाच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पोलिसांना ललित पाटीलचा ठाव ठिकाणा कळाला. त्यानंतर तो अलगद पोलिसांच्या हाती लागला. आता पुणे पोलीस प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोघींची कसून चौकशी करत आहे.
या ललित पाटीलची बेनामी संपत्ती त्यांच्याकडे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रज्ञा आणि अर्चना या दोघींकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. ललितची बेनामी संपत्ती आहे का? ललितला फरार होण्यासाठी कशी मदत केली? नाशिकमध्ये ड्रग्सचं रॅकेट कोण चालवतं? या रॅकेटमध्ये आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे?
तसंच नाशिक, पुण्यासह इतर शहरात हे रॅकेट्स आहे काय? ते कोण चालवतं? ड्रग्स कुठून आणलं जातं? कुठं लपवलं जातं? याची माहितीही चौकशीतून मिळण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम पोलीस चौकशीत काय माहिती देतात. तसेच यातून काही काय नवनवीन खुलासे समोर येतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.