Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मकरसंक्रांतीला ₹३००० जमा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment : महापालिका निवडणुकीआधी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू नये, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. यासंदर्भात आता देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.

Siddhi Hande

लाडकीला महापालिका निवडणुकीआधी ₹३००० मिळणार की नाही?

काँग्रेसचे निवडणुक आयोगाला पत्र

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मकरसंक्रांतीला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबर आणि जानेवारीचे ३००० रुपये एकत्र येणार आहेत. दरम्यान, आता या योजनेचा हप्ता मकरसंक्रांतीला येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागचे कारण म्हणजे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरुन काँग्रेसचे निवडणुक आयोगाला पत्र

लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, पण महापालिका निवडणूकीनंतर योजनेचा हप्ता वितरित करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.यासंदर्भात पत्रदेखील पाठवले आहे. दरम्यान, आता यानंतर १४ जानेवारीआधी महिलांना पैसे येणार की नाही असा प्रश्न पडला होता. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)

काँग्रेस आणि विरोधक पहिल्यापासून आमच्या लाडक्या बहि‍णींना विरोध करत आहेत. मागच्या काळात जेव्हा योजना सुरु केली तेव्हा ही योजना बंद करा, अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयातदेखील गेले होते. आता लाडक्या बहि‍णींना पैसे देऊ नका, असं म्हणतात. लाडकी बहीण योजना ही सुरु असलेली योजना आहे. आचारसंहितेमध्ये म्हटले की, कोणतीही सुरु असलेली योजना थांबवता येत नाही. त्यामुळे कोणी कितीही काहीही पत्र लिहली तरीही योजना थांबवता येणार नाही, लाडकी बहीण योजना थांबणार नाही, महिलांना पैसे येतीलच, असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन तरी असंच वाटत आहे की, योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील. महिलांच्या खात्यात लवकरच पैसे दिले जातील. महापालिकेच्या निवडणुकीआधी ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT