Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार नाहीत? आदिती तटकरेंनी थेट कारणच सांगितलं

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दर महिन्याला मिळत आहे. या योजनेत आता २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, या योजनेचा निधी वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याबाबत घोषणा होईल, असंही सांगितलं होतं. मात्र, आता मार्चमध्येही महिलांना २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्च महिन्यात लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आता मार्च महिन्यात पैसे मिळणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे. याचे कारण म्हणजे महिला व बालविकास विभागाकडून पैसे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलाच नाही. त्यामुळे या योजनेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यात पैसे मिळणार की नाही याबाबत आदिती तटकरे यांनीही माहिती दिली आहे.लाडकी बहीण योजना सुरु करण्याआधी अर्थमंत्रालयाने तीन चार महिने अगोदर तयारी केली होती. आता हप्ता २१०० रुपये वाढवण्यासाठीही अशीच तयारी करावी लागेल. अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहि‍णींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये मिळतील, असं विधान केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाब सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता आदिती तटकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT