Surabhi Jayashree Jagdish
अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रिक्षाने रुग्णालयात नेण्यात आलं.
ऑटोचालक भजन सिंग याने सांगितले की, तो त्याची रिक्षा रोजच्या दिशेने घेऊन जात असताना मागून मदतीसाठी हाक ऐकू आली.
चालकाने यू-टर्न घेत गाडी गेटवर उभी करून त्यांना ऑटोमध्ये बसवलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला पाहून तोही थोडा घाबरला, पण सैफ अली खान जखमी अवस्थेत त्याच्या समोर होता हे त्याला ओळखता आलं नाही.
तोपर्यंत सैफ अली खान शुद्धीवर आला होता, जखमी अवस्थेत त्याने ड्रायव्हरला अनेक वेळा विचारले की, त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचायला किती वेळ लागेल?
चालक भजन सिंगने त्याला वेळेवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात नेलं. यावेळी तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
सैफ अली खानला रुग्णालयात नेण्यासाठी चालकाने एक रुपयाही घेतला नाही.