Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच जाहीर केलं

Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी पत्रक जारी केले आहे. या पत्रकात लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार का? याबाबत माहिती दिली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाला असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार?योजनेचे निकष बदलणार? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. याबाबत आता स्वतः आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. (Ladki Bahin yojana)

लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या सर्व अफवा असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.समाज व बालविकास विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. (Ladki bahin yojana update)

महिला व बालकल्याण विभागाने एक पत्रक जारी केले आहे. याचसोबत आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असं सांगण्यात आले आहे. आदिती तटकरे यांनी म्हटलंय की, 'लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर लक्ष ठेवून आहे तरी समाजमाध्यमातून होणाऱ्या या चुकीच्या माहितीला कोणीही बळी पडू नये, ही नम्र विनंती.'असं त्यांनी म्हटलं आहे. (Women and Child Welfare Department)

महिला व बालकल्याण विभागाचे पत्रक

महिला व बाककल्याण विभागाच्या परिपत्रकात म्हटलंय की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रिल्स आणि व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरुन कार्यालयाकडे विचारणा होत आहे. यामुळे आपणास सांगण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अस कळवण्यात येईल. तसेच महिला व बालकल्याण विभागाने शासकीय यंत्रणांना सुचवलं की, त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा. चुकीच्या माहितीमुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये, याकरता आपण अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी महिला आणि जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT