Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी काम करून घेतलं, पण पैसेच दिले नाही; अंगणवाडी सेविकांचा धक्कादायक खुलासा

Ladki Bahin Yojana hired Anganwadi Worker but remains Unpaid: लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. मात्र, अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Anganwadi ladki bahin yojana
Anganwadi ladki bahin yojanaSaam Tv
Published On

लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा खुप मोठा वाटा आहे. मात्र, त्यांना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडून भरण्यात आला. मात्र, त्यांना कामाचा मोबदला, म्हणजेच प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नाही. दरम्यान आमच्या कामाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. महायुती सरकारला सत्ता स्थापन करण्यास याची मदत झाली. मात्र, या योजनेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्यावा अशी मागणी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

Anganwadi ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार; कशी असणार प्रक्रिया? वाचा एका क्लिकवर

अहिल्यानगरातील ५ हजार १८३ अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक अर्जामागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते. सरकारने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्यानुसार अंगणवाडी सेविका यांनी दोनशे ते तीनशे अर्ज भरलेले आहेत. मात्र , जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला असला तरी, अंगणवाडी सेविका हे प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहिले आहे.

Anganwadi ladki bahin yojana
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! डिसेंबरच्या हप्त्याची तारीख ठरली, मोठी अपडेट आली समोर

राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत केली आहे. सध्या त्यांची जिल्हास्तरावर माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. माहिती उपलब्ध झाल्यास त्यांना लगेच प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी - महिला व बालकल्याण विभागाचे मनोज ससे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com