Ladki Bahin Yojana Update canva
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: डिसेंबर की जानेवारी? लाडक्या बहिणींना पुढचा हफ्ता कधी मिळणार, समोर आली नवी तारीख

Ladki Bahin Yojana Update: राज्यामध्ये लाडकी बहीण योजना १ जुलैपासून लागू झाली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना पाच हफ्त्याचे पैसे मिळाले आहेत. ते सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत आहेत.

Priya More

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना १ जुलैपासून लागू झाली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना पाच हफ्त्याचे पैसे मिळाले आहेत. त्यांना आतापर्यंत लाडक्या बहिणींना ७,५०० रुपये मिळाले आहेत. आता ते सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली होती. डिसेंबर महिन्याचा हफ्ता हिवाळी अधिवशेन संपल्यानंतर दिला जाईल असे त्यांनी सांगितले होते. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसंच, आम्ही दिलेले आश्वासने पूर्ण करु. कोणालाही शंका नसावी असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे अधिवेशन संपल्यानंतर लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहेत. पण हिवाळी अधिवशेन २१ डिसेंबरला संपणार आहे. अशामध्ये आता अशिवेशन संपून २ दिवस झाले. त्यामुळे लाडक्या बहिणी त्यांच्या बॅक खात्यामध्ये पैसे कधी येणार याची वाट पाहत आहेत. अद्याप त्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली नाही.

अधिवशेन संपले आता डिसेंबर महिना देखील संपत आला तरी राज्याचाय लाडक्या बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण राज्यातील लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा होण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहाव्या हफ्त्याचे पैसे नव्या वर्षातच मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर लाभार्थी महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये दरमहा मिळू शकतात. महायुतीचे सरकार आले आहे. पण आता २१०० रुपये कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता २१०० नाही तर १५०० रुपयेच मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT