Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: २० लाख शेतकरी महिला नावडत्या; 'नमो शेतकरी' योजनेपासून राहणार वंचित

Namo Shetkari Yojana: लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. या महिलांचे नमो शेतकरी योजनेतील ६००० रुपये कापले जाणार आहे.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला खूप यश मिळालं.या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. परंतु आता लाडक्या शेतकरी बहि‍णींना नमो शेतकरी योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नाहीये. (Ladki bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या २० लाख शेतकरी महिलांना नमो शेतकरी योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नाहीये. या योजनेत वर्षाला १८००० रुपये दिले जायचे. परंतु आता यातील ६००० रुपये कापले जाणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेत लाभाची रक्कम आता कमी मिळणार आहे. म्हणजेच फक्त १२००० रुपये वार्षिक मिळणार आहे. (Namo Shetkari Yojana)

लाडकी बहीण योजनेच्या सर्वाधिक लाभार्थी महिला या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्याही लाभार्थी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकरी महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

लाडकी बहिण आणि नमो शेतकरी योजनेच्या २० लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत, असं सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता या महिलांचे पैसे कापले जाणार आहे.म्हणजेच महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत फक्त १२००० रुपये मिळणार आहेत.

याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, इतर योजनांचा लाभा घेणाऱ्या महिलांना घेतलेल्या रक्कमेच्या वरील रक्कम लाडकी बहीण योजनेतून देण्यातयेणार आहे. त्यासाठी आम्ही कृषी विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करु.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT