
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर येत आहे. जर निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा लाडक्या बहिणींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा महिलांना मिळालेले पैसे पुन्हा सरकार जमा होण्याची शक्यता आहे. याची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे. एका महिलेकडून ५ महिन्याचे ७ हजार ५०० रुपये परत घेण्यात आले आहेत, अशा आशयाच्या बातम्या आज दिवसभरात झळकल्यानंतर लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
याबद्दल धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पापळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजने संदर्भात कुठल्याही प्रकारची उलट तपासणी किंवा लाडक्या बहिणींची चौकशी करण्याचे आदेश नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हाधिकारी पापळकर यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले पैसे परत घेण्याबाबत प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारचे आदेश नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर लाडक्या बहिणीनेच आपल्या मुलाच्या खात्यावर आलेले पैसे स्वतःहून परत केले असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
धुळे तालुक्यातील नकाने येथील भिकुबाई खैरनार या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलेने लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करताना चुकून आपल्या अर्जासोबत आपल्या मुलाचे आधार कार्ड जमा केल्यानंतर, लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याने, सदर महिलेच्या ही आपली चूक असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने प्रशासनाकडे हे सर्व पैसे आपणहून परत केले आहे.
यावर जिल्हा प्रशासनातर्फे देखील धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देखील प्रशासनाच्या नजरचुकीने लाभार्थी महिलेचे पैसे मुलाच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाल्यानंतर सदर महिलेने आपण हुन प्रशासनाकडे पैसे परत केले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर प्रशासनातर्फे लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे किंवा त्यांची उलट तपासणी करण्याचे कुठलेही आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे अशा कुठल्याही प्रकारची उलट तपासणी जिल्हा प्रशासनातर्फे केली नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.