Ladki Bahin Yojana Salary SaamTV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : पडताळणीनंतरच 'लाडकी'ला हफ्ता? पडताळणी होईपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता नाही? फेब्रुवारीत लाडकींची संख्या घटणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याची वाट पाहताय. मग जरा थांबा. कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती, याचा सध्या शोध घेतला जातोय.

Prashant Patil

मुंबई : लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागलीय. पुढचा हप्ता कधी मिळणार? पडताळणी झाल्यानंतरच बँकेत पैसे पडणार की आधीच पडणार? फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार यावरचा हा विशेष रिपोर्ट.

लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याची वाट पाहताय. मग जरा थांबा. कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती, याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार, शेती, आणि इतर बाबी आहेत त्यांची पडताळणी सुरु आहे. अंगणवाडी सेविकांकडून माहिती तपासून घेतली जात आहे. त्यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागतील. पडताळणीचा अहवाल ८ दिवसांनी सरकारला सादर होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल, अशी शक्यता व्यक्त होतेय. लाडक्या बहिणींची कोणत्या ५ टप्प्यांवर पडताळणी होणारेय पाहूयात.

लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे ५ टप्पे

एका कुटुंबात एकपेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी

बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे

कुटुंबातील एकाला निवृत्तीवेतन असल्यास

अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे

५ एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत.

दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबला आहे. तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या पाच लाख 40 हजारांपर्यंत पोहचली आहे. या सर्वांचा लाडकी बहिण योजनेचा लाभ थांबवला आहे. मात्र आत्तापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारी तिजोरीतल्या सुमारे 450 कोटी रुपयांचा चुराडा झालाय. योजनेच्या सुरुवातीलाच अर्जांची गांभीर्यांने पडताळणी आवश्यक होती. म्हणजे ही वेळ आली नसती. आता फेब्रुवारीत लाडकींची संख्या आणखी कितीने घटणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT