Raigad Mangaon ST BUS Accident Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाताना अपघात; २९ महिलांना घेऊन जाणारी एसटी बस ५० फूट दरीत कोसळली

Ladki Bahin Yojana in Raigad : लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाताना एसटी बसचा अपघात झाला आहे. रायगडमधील माणगावजवळ ही घटना घडली.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला महिलांना घेऊन जाणाऱ्या बसला रायगडमधील माणगावमध्ये भीषण अपघात झाला. एसटी बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. रायगड येथे आज लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम होणार होता. त्यासाठी एसटी बसमधून महिला निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात घडला.

एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली आहे. माणगाव तालुक्यातील मांजरोने घाटात ही घटना घडली. या अपघातामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.

लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी माणगाव येथे जाताना हा अपघात झाला. रानवडे कोंड येथून २९ महिला माणगाव येथे कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. त्यामधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT