Ladki Bahin Yojana KYC Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana KYC: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार केवायसी

Ladki Bahin Yojana KYC will done by anganwadi sevika : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन केवायसी करणार आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

आता अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची केवायसी

ज्या महिलांना अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता केवायसी करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत. केवायसीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करायचे आहे. अजूनही लाखो महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. जर लाडक्या बहि‍णींनी केवायसी केले नाही तर त्यांचा लाभ बंद केला जाऊ शकतो. दरम्यान, केवायसीची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची केवायसी (Anganwadi Sevika Will do Ladki Bahin Yojana KYC)

लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवा. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक केले आहे. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही प्रोसेस अनिवार्य केली आहे. दरम्यान, आता ई केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.

ई केवायसी करताना अजूनही लाभार्थी महिलांना खूप अडचणी येत आहेत. सर्व्हर डाउन किंवा ओटीपी येत नसल्याने ही प्रोसेस होत नाही. त्यामुळेच आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची केवायसी करणार आहेत.केवायसी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केली होती. तरीही महिलांना अडचणी येत आहेत. यासाठीच महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

चूक सुधारण्याची एकच संधी (Ladki Bahin Yojana KYC Mistake)

ई केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. याचसोबत ई केवायसी प्रक्रियेत जर कोणतीही चूक झाली असेल तर त्यासाठी एक संधी मिळणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही चूक सुधारु शकतात. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT