Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात; पैसे आले की नाही अशा पद्धतीने करा चेक

Ladki Bahin Yojana January Month Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार होता. दरम्यान, आता महिलांच्या अकाउंटला पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)

मिडिया रिपोर्टनुसार, लाडक्या बहि‍णींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून दोन दिवस आहेत त्याआधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील, असं सांगितलं जात आहे. २६ जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना २६ तारखेपर्यंत पैसे मिळतील, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत.

पैसे आले की नाही कसं चेक कराल?

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यावर मेसेज येईल. जर मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेच्या अॅपवर जाऊन पैसे आले की नाही ते चेक करु शकतात. बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंट डिटेल्समध्ये जा. तुम्हाला अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते समजेल. तसेच तुम्ही बँकेत जाऊनदेखील पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात.

लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीबाबत संभ्रम

लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील, असं सांगितलं होतं. मात्र, आता हे पैसे मार्च महिन्यानंतरदेखील मिळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. बालविकास विभागाने अर्थमंत्रालयाकडे अजून वाढीव निधीबाबत शिफारस केली नसल्याची माहिती स्वतः आदिती तटकरेंनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT