Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बांग्लादेशी? लाडकी बहीण योजनेत घुसखोर लाभार्थी, पाहा स्पेशल रिपोर्ट

Ladki Bahin Yojana News :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चक्क बांग्लादेशी महिलेनं घेतलाय. त्यामुळे मोठी खळबळ माजलीय. या महिलेनं कसा लाडकीचा लाभ घेतला? तिनं नेमकं किती पैसे लाटले यावरचा हा विशेष रिपोर्ट.
bangladeshi woman
bangladeshi womanMeta Ai
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विविध कारणांमुळे चर्चेत असते.. या योजनेवर श्रीमंत लाडक्या बहीणीने नाही तर बांग्लादेशी घुसखोर महिलेने डल्ला मारल्याचं समोर आलंय...घुसखोर बांग्लादेशींविरोधात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत कामाठीपुऱ्यातून 5 बांग्लादेशींसह एक दलालाही अटक केलीय आणि यातूनच बांग्लादेशी महिलेचं पितळ उघडं पडलंय... हे प्रकरण कसं उघड झालं? पाहूयात...

बांग्लादेशी लाडकी बहीण

- बांग्लादेशी घुसखोर शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन

- आतापर्यंत मुंबईत 50 बांग्लादेशी घुसखोरांवर अटकेची कारवाई

- कामाठीपुऱ्यात धाड टाकून 5 बांग्लादेशींसह 1 दलालाला ठोकल्या बेड्या

- दलालाकडून बनावट कागदपत्रं घेऊन घुसखोरी केल्याचं स्पष्ट

- बनावट कागदपत्रांच्या आधारेच लाडकी बहीण योजनेवर डल्ला

बांग्लादेशी महिलेने लाडकीचा लाभ घेतल्यावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय.. तर योजना सुरु केली त्यावेळी लाडक्या बहीणींचं आधार लिंक करण्यासाठी कमी वेळ मिळाल्याची कबुलीच अजित पवारांनी दिलीय. दुसरीकडे बांग्लादेशी महिलेकडे सगळी कागदपत्रं असल्याने ती बांग्लादेशी कशी? असा सवाल महिलेच्या वकीलाने उपस्थित केलाय.

bangladeshi woman
Pune Crime News : मुलासमोरच पतीनं पत्नीला संपवलं, कात्रीनं गळा चिरून व्हिडिओ बनवला

पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये बांग्लादेशी घुसखोरांसोबतच त्यांनी सरकारच्या योजनांवर डल्ला मारल्याचंही दिसून येतंय. त्यामुळे फक्त कामाठीपुऱ्यातून अटक केलेल्या बांग्लादेशी महिलेनेच लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटलाय की हे फक्त हिमनगाचं टोक आहे, याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे. एवढंच नाही तर घुसखोरांना बनावट कागदपत्रं मिळवून देणारी टोळीही जेरबंद करायला हवी.

bangladeshi woman
Maharashtra Politics : नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? अमित शाह-एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com