Pune Crime News : मुलासमोरच पतीनं पत्नीला संपवलं, कात्रीनं गळा चिरून व्हिडिओ बनवला

Pune Crime Video : पुण्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडलीय. पाच वर्षाच्या मुलासमोरच पतीनं पत्तीची हत्या केलीय. पती-पत्नीत नेमकं काय घडलं? हत्येनंतर पतीनं व्हिडिओ काढू तो का व्हायरल केला? यावरचा विशेष रिपोर्ट.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

Pune Crime News : पुण्यातल्या खराडीतील या घरात 8 वर्षांच्या संसाराची राखरांगोळी झालीय. शिवदास गिते गेल्या चार - पाच महिन्यांपासून आपल्या पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलासह या घरात राहत होता. शिवदास हा पुण्यातल्या दिवाणी न्यायालयात स्टेनो म्हणून काम करत होता. मात्र १५ जानेवारीला तो परीक्षेत नापास झाला आणि त्याचा जॉब गेला. त्याच्या पत्नीनं त्याच्याकडे पुन्हा परीक्षा देण्यासाठी आग्रह धरला.

22 जानेवारीला संध्याकाळी हा वाद टोकाला गेला आणि ज्या शिलाई मशीन आणि कात्रीनं ज्योती संसाराला हातभार लावत होती त्याच कात्रीनं शिवदासनं तिचा गळा चिरला. सर्वात धक्कादायक म्हणजे घरात असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्यासमोर हृदयाचा थरकाप उडवणारा हा निर्घृण प्रकार घडत होता. नराधम शिवदास एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या पत्नीचा व्हिडिओही काढला आणि तो मित्रांनाही पाठवला. या व्हिडिओत त्यानं पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला.

Pune Crime News
Sambhajinagar News : आधी लाथाबुक्या, मग फोडल्या काचा; पैसे मागितल्यावरुन मेडिकल चालकाला तरुणांकडून बेदम मारहाण

आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर नराधम शिवदासनं थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा अटक केलीय. गिते कुटुंब हे बीडचं असून कामानिमित्तानं पुण्यातल्या खराडीत वास्तव्याला होतं. मात्र गेल्या पाच महिन्यांत त्यांच्यात कधी वाद झाल्याचं ऐकिवात नसल्याचं घरमालकांचं म्हणणंय. नवरा-बाय़कोत भांडणं तशी नवी नाहीत. मात्र सोन्यासारखा पाच वर्षांचा चिमुकला डोळ्यासमोर असताना त्याच्या माय मावलीचा गळा चिरण्यापूर्वी बापाचं काळीज कसं पिळवटलं नाही?

Pune Crime News
Raigad News : बापलेकीच्या नात्याला काळीमा! वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 7-8 वर्षांपासून सुरू होता छळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com