Ladki Bahin Yojana  Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेकांनी बनावट खाती उघडली आहेत. त्यातून ते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. महिलांच्या नावाचा वापर करुनदेखील अनेकांनी बनावट खाती उघडली आहे. यामधून राज्य सरकारची तब्बल १९ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहेत. या योजनेअंतर्गत तब्बल १०४ बनावट खाती उघडण्यात आली होती. यामुळे सुमारे १९ लाख ४३ हजार रुपयांचा सरकारी निधी बनावट खात्यात जमा केला गेला. यामुळे सरकारची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.

बनावट बँक खाती उघडून त्यात लाभ घेण्यात आलीा आहे. दरम्यान, आता ही खाती गोठवण्यात आली आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही सांगितल आहे.

आमदार देवयानी फरांदे, सुनील प्रभू, अभिमन्यू पवार यांच्यासह अनेकांची याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखी उत्तर दिले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती तयार करुन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मुंबईत दोन गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय सातारा, सोलापूर, नांदेडमध्ये एकेक गुन्हा दाखल झाला आहे. जुहू पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या तपासात १०४ बनावट बँक खाती उघडल्याचे समोर आली आहे. या गुन्ह्यातील बँक खाती आणि खातेधारक खरे आहेत. बँक खातेधारकांना प्रत्येकी १-१ हजार रुपये देऊन बँक खाती खरेदी केली. यामागील गुन्हेगाराचे नाव प्रतीक पटेल आहे. हा व्यक्ती फरारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghagra-choli Designs : गरब्यासाठी स्टायलिश घागरा-चोळीच्या ७ लेटेस्ट डिझाइन्स, नवरात्रीआधी करा शॉपिंग

Aadi Anant: अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट; 'आदि अनंत'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

Maharashtra News Live Update: ४ तारखेच्या मोर्चा बाबत राज ठाकरेंनी बोलवली नेत्यांची बैठक

Horoscope October : ऑक्टोबरमध्ये ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मिळू शकतो लाभ

Rohit Sharma: ‘मला जिंकण्याचा तो अनुभव पुन्हा हवाय’; 2027 वर्ल्ड कपबाबत रोहित शर्माने सांगितली मनातली इच्छा

SCROLL FOR NEXT