Wireless Charging Tips: सतत वायरलेस पॉवर बँक वापरताय? नुकसान टाळण्यासाठी 'या' टिप्स लक्षात ठेवा

Dhanshri Shintre

वायरलेस पॉवर बँक

वायरलेस पॉवर बँक वापरण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि आवश्यक ठरणार आहे.

वायरची आवश्यकता नाही

आता फोन चार्ज करताना वायरची आवश्यकता नाही, कारण वायरलेस पॉवर बँक कॉइल किंवा चुंबकाद्वारे ऊर्जा पुरवते.

फोन गरम होणे

वायरलेस चार्जिंगमुळे फोनमध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होते, ज्याचा परिणाम बॅटरीच्या आयुष्यावर नकारात्मक होऊ शकतो.

अधिक वेळ

वायरलेस चार्जिंग ही वायर चार्जिंगपेक्षा मंद असते, त्यामुळे फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी अधिक वेळ लागतो.

बॅटरी लवकर निकामी

वारंवार वायरलेस चार्जिंग केल्यास बॅटरी सायकलवर परिणाम होतो आणि त्यामुळे बॅटरी लवकर निकामी होण्याची शक्यता असते.

सिग्नल कमजोर

काही वेळा वायरलेस चार्जरमुळे फोनचे वाय-फाय किंवा ब्लूटूथ सिग्नल कमजोर होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

स्वस्त उत्पादने

प्रमाणित आणि विश्वसनीय ब्रँडचे उपकरण वापरल्यास वायरलेस चार्जिंग सुरक्षित असते, पण स्वस्त लोकल उत्पादने टाळावीत.

सुरक्षित व प्रभावी

वायरलेस पॉवरबँक एक उत्तम तंत्रज्ञान आहे, पण योग्य वापर केल्यासच ती सुरक्षित व प्रभावी ठरते, अन्यथा त्रास होऊ शकतो.

NEXT: फोन चार्ज करताना आग लागण्याचा धोका कसा वाढतो? चार्जिंगदरम्यान लक्षात ठेवा 'या' गोष्टी

येथे क्लिक करा