Ladki bahin yojana  Saam tv
महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये कोणाला मिळणार? नवीन अपडेट समोर

Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पडताळणीनंतर एकत्रित तीन महिन्यांचे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना मिळाणारे लाभ बंद

ई-केवायसीनंतर पडताळणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जबाबदारी

पात्र लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे एकत्र ४५०० रुपये मिळण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना आताही जोरदार चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यात महिना १५०० रुपये जमा होत आहेत. परंतु याच योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकीकडे ई-केवायसी न झाल्याने अनेक महिलांना लाभ मिळेना झाले आहेत. ई-केवायसी करूनही काही महिलांना लाभ मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर महिला बालकल्याण विभागाने महिलांच्या घरी जाऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा ई-केवायसी करूनही लाभ न मिळालेल्या महिलांची अंगणवाडीच्या कर्मचारी पडताळणी करणार आहेत. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना महिन्याचा हप्ता मिळणे सुरू होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभ न मिळालेल्या महिलांची अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून पडताळणी झाल्यास, पात्र महिलांना पैसे मिळण्यास सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना थेट ४५०० रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत महिलांना तीन महिन्यांचे पैसे मिळणार असल्याची माहिती हाती आली आहे.

तत्पूर्वी, लाडकी बहीण योजनेवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं भाष्य केलं आहे. 'तिजोरीच्या आमच्याकडे होत्या. अजितदादा गेल्यानंतर अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे गेलं. अधिवेशनानंतर खाते आमच्याकडे येईल. त्यामुळे २१०० रुपये दिल्याशिवाय राहणार नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT