Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: ईकेवायसीनंतरही लाडक्या बहिणींना फटका! ४ जिल्ह्यातील हजारो महिलांचे लाभ बंद; तुमचं तर नाव नाही ना?

Ladki Bahin Yojana Buldhana Women will not get Installment: लाडकी बहीण योजनेत राज्यातील हजारो महिलांचे लाभ बंद झाले आहेत. त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

राज्यातील हजारो महिलांचे लाभ बंद

केवायसीची लिंक पुन्हा सुरु करण्याची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. दरम्यान, हा हप्ता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाहीये. सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, ज्या महिलांनी केवायसी केले आहेत. त्यांच्याही खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे विविध जिल्ह्यातील महिलांनी मोर्चे काढले आहेत.

बुलढाण्यात ३० हजार महिलांचा लाभ बंद

लाडकी बहीण योजनेचा मागच्या महिन्याचा हप्ता जवळपास अनेक महिलांना मिळालेला नाही. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील ३० हजार महिलांचा लाभ बंद केला आहे. ई केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचा लाभ थांबवला असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, लाभ बंद झाल्याने महिला थेट बुलढाणा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात गेल्या आहेत. ई केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

वाशिममध्येही महिलांचा लाभ बंद

वाशिममध्येही अनेक महिलांचा लाभ बंद केला आहे. ई केवायसी करुनही नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, असं महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या आहेत.

हिंगोलीतील महिलांचाही उद्रेक

हिंगोलीतील महिलांचीही अशीच परिस्थिती आहे. सेनगाव औंढा ,कळमनुरी ,वसमत, आणि हिंगोली अशा पाच तालुक्यातील हजारो महिलांचा लाभ बंद झाला आहे.यासंदर्भात महिलांनी थेट मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहले आहे.

यवतमाळमध्येही हजारो महिलांचा लाभ बंद

लाडकी बहीण योजनेत यवतमाळमधील महिलांचा लाभ बंद झाला आहे. यवतमाळमधील सहा लाख महिला पात्र ठरल्या होत्या. मध्यंतरी पडताळणी करण्यात आली तेव्हा निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद केले. त्यानंतर आता ईकेवायसी केल्यानंतरही अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळमधील केवायसी पुन्हा सुरु करावी, असं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Salary: महापौरला किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात?

Prasad Oak : प्रसाद ओकनं गुपचूप उरकला लेकाचा साखरपुडा; होणारी सून आहे तरी कोण? पाहा PHOTOS

Nitin Nabin Net Worth: कोण आहेत भाजपचे नवीन अध्यक्ष नितीन नबीन? शिक्षण आणि संपत्ती किती? वाचा सविस्तर

Mayor Election : एकनाथ शिंदेंवर भाजप नेतृत्व नाराज, 'हॉटेल पॉलिटिक्स'वरून राजकारण तापले, दिल्लीकडे तक्रार

Kitchen Hacks : तांदळात किडे होतात? मग या योग्य पध्दतीने तांदुळ साठवा किडे होतील गायब

SCROLL FOR NEXT