Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : ₹१५०० बंद होण्याची भीती वाटतेय, लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा

Ladki Bahin Yojana eKYC Process: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला १५०० रुपयांचा लाभ मिळणार नाहीये.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य

केवायसी न केल्यास महिलांना मिळणार नाहीत ₹१५००

महाराष्ट्र सरकारच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहे. या निकषांमध्ये पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी एक काम करायचे आहे. तुम्हाला तुमची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

ई केवायसीबाबत निर्णय

लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थ्यांना दर वर्षी ई केवायसी करायची आहे. जर तुम्ही ई केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी केवायसी करायची आहे. दरम्यान, जर महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असेल तर ते केवायसीमधून समोर येणार आहे. परिणामी त्यांना योजनेतून बाद केले जाणार आहे. सर्व पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, हे केवायसी करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

३१ डिसेंबरपूर्वी करा हे काम

लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात तुम्हाला केवायसी करायचे आहे. केवायसीची संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाइन आहे.

यासाठी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन संपूर्ण प्र्क्रिया करायची आहे. येथे तुम्हाला लाभार्थी महिलांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या फोनवर जो ओटीपी येईल तो टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा पतीची केवायसी करायची आहे. यासाठी सेम प्रोसेस आहे. तुमच्या वडिलांची किंवा पतीचा आधार नंबर टाका. त्यानंतर लिंक केलेल्या नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर केवायसी पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT