Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २० दिवस, eKYC न करणाऱ्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार नाहीत? अधिवेशनात काय चर्चा झाली?

Ladki Bahin Yojana KYC Update: लाडकी बहीण योजनेत ई केवायसीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत १.७४ लाख महिलांचे केवायसी झाले आहे. ई केवायसी करण्यासाठी शेवटचे २० दिवस उरले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीबाबत अपडेट

आतापर्यंत किती महिलांचे केवायसी झाले?

आदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती

लाडकी बहीण योजनेबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी सांगितली आहे. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत आता महिलांना ईकेवायसी करणेदेखील अनिवार्य केले आहे. जर केवायसी केले नाही तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

आतापर्यंत किती लाडक्या बहिणींची केवायसी झाली? (Ladki Bahin Yojana KYC Update)

आदिती तटकरेंनी ईकेवायसीबाबत माहिती देताना सांगितले की, लाभार्थींचे अचूक प्रमाणीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती झाली आहे.आतापर्यंत 1 कोटी 74 लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबर असून, उर्वरित लाभार्थ्यांनाही ही सुविधा उपलब्ध आहे.

लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची शेवटची तारीख (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

डिसेंबर अखेरपर्यंत सर्व महिलांना केवायसी पूर्ण करायची आहे. ज्या महिला केवायसी करणार नाहीत. त्यांचा लाभ बंद होणार आहे. फेब्रुवारीपासून त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. याचसोबत ई केवायसीमधून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न आज विधानसभेत विचारण्यात आले. यावर मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिल आहे. त्यांनी सांगितले की,  २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६  महिला योजनेचा लाभ घेत आहेत. यातील काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून वसूलीदेखील केली जात आहे, असंही सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT