Ladki bahin yojana latest News  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: गरिबाचा घास लाडकीच्या घशात? गरिबांची शिवभोजन थाळी बंद होणार, आनंदाच्या शिधालाही लागणार कात्री?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना आता गरिबांच्या जेवणावरच उठलीय. लाडकीमुळे गरिबांचं पोट भरणारी आणि दिवाळी गोड करणाऱ्या कोणत्या योजनांवर गंडांतर येणारआहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळवून देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आता गरिबांच्या घासावरच उठलीय. राज्य सरकारनं निधीअभावी गरिबांसाठी सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद करण्याचा घाट घातल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मविआ सरकारच्या काळात शिवभोजन थाळी योजना लोकप्रिय ठरली होती. शिवभोजन थाळीत फक्त 10 रुपयांमध्ये जेवण मिळतं.

मात्र आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवभोजनच्या दररोज 2 लाख थाळींसाठी वार्षिक 267 कोटींचा खर्च आहे. गरिबांची दिवाळी गोड करणारी आनंदाचा शिधा योजनेवरही गंडांतर येणायची शक्यता आहे. राज्यात आणखी कोणत्या लोकप्रिय योजना आहेत ते पाहूया.

लोकप्रिय योजना, पैसा पुरेना?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

46,000 कोटी ₹

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

14,761 कोटी ₹

मुलींना मोफत उच्च शिक्षण

1,800 कोटी ₹

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण

5,500 कोटी ₹

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

1,300 कोटी ₹

लेक लाडकी योजना

1,000 कोटी ₹

मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना

400 कोटी ₹

मुख्यमंत्री वयोश्री योजना

480 कोटी ₹

गाव तिथे गोदाम योजना

341 कोटी ₹

दरम्यान गोरगरीबांसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवा, अशी मागणी माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलीये. तर सरकारला गोरगरीबांना अन्न देणं परवडत नाही, अशी टोला ठाकरे गटानं लगावला आहे.

आधीच लाडकीमुळे विविध विकासकामांच्या तब्बल ८९ हजार कोटींची देणी बाकी असल्याचं समोर आलंय. आता लाडकी बहीण योजना थेट गोरगरिबांच्या घासावरच उठल्याचं दिसतंय. सरकारनं तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी गरिबांचा घास हिसकावण्यापेक्षा बोगस लाडक्यांचा शोध घ्यायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोपाला कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

Mhada Homes: मुंबईत म्हाडाची घरे महागली! ठाणे, पनवेल, पालघर परिसरात ३५० हेक्टर जमीन उपलब्ध करण्याची मागणी

New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

Arvind Srinivas: फक्त ३१व्या वर्षी तब्बल २१,१९० कोटींचा मालक, कोण आहेत अरविंद श्रिनिवास?

SCROLL FOR NEXT