Ladki Bahin Yojana update  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹३००० येणार, महत्वाची अपडेट समोर

Ladki Bahin Yojana update: लाडकी बहिणींच्या खात्यात लवकरच योजनेचा हफ्ता जमा होणार आहेत. लाडकींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये एकत्रित मिळणार आहेत. याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे

  • लाभार्थी महिलांना एकत्रित ३००० हप्ता लवकरच मिळणार आहे

  • नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्याचा सरकारचा निर्णय

  • ई-केवायसी पूर्ण करण्याची तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे एकत्रित देण्यात येणार आहेत. हे पैसे कधी येणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत.

महापालिका निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित पाठवला जाईल. त्यामुळे त्यांच्या खात्यात एकत्रित ३००० रुपये जमा होतील ही महायुती सरकारची सुनियोजित रणनीती असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या निर्णयाचा महायुती सरकारला फायदा होऊ शकतो असे देखील मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकाच वेळी दोन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे देऊन महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकेल. सुत्रांनी सांगितले की, नोव्हेंबरचा हफ्ता अद्याप देण्यात आला नाही. सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हफ्ता एकत्रित पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होतील. आचारसंहितेदरम्यान कोणत्याही प्रकारची वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देण्यात खबरदारी घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सरकारला लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो.

तसंच, सरकारने याआधी आणि आता देखील हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, 'लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. या योजनेचे पैसे लाडकींच्या खात्यात जमा केले जातील. योग्य वेळी आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ.' तर, आतापर्यंत २ कोटी ४३ लाख लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशन झाले असून ई -केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Highway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक महामार्ग, कल्याण ते लातूर प्रवास फक्त ४ तासांत; काय आहे सरकारचा प्लान?

Maharashtra Live News Update: लोकनेते मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर उसळणार अलोट गर्दी

"बाबुराव को गुस्सा क्यू आता है"? पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा आणखी एक व्हिडिओ अन् पुन्हा गुन्हा, वाचा प्रकरण

Hrithik Roshan On Dhurandhar: अक्षय खन्नाच्या धुरंधरमधील ही गोष्ट हृतिक रोशनला खटकली, म्हणाला - 'मी सहमत नाही...'

पुण्यात ५३२ कोटींचा प्रोजेक्ट, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, वाचा नेमका प्लान आहे तरी काय

SCROLL FOR NEXT