Ladki Bahin  prahaar .in
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या अर्जांची छाननी होणार? बहिणींनो, तुमचे 1500 रुपये होणार बंद?

Ladki Bahin Yojana: विधानसभेला महायुतीच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकणाऱ्या लाडक्या बहीणींच्या अर्जांची छाननी होण्याची शक्यता आहे. त्यात 40 लाख लाडक्या दोडक्या होण्याची शक्यता आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेला आता सरकार कलाटणी देण्याची शक्यता आहे. अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि चारचाकी वाहन असलेल्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्यात येणार असून तब्बल 40 लाख अर्ज बाद होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र या योजनेची सद्यस्थिती आणि निकष काय आहेत? पाहूयात.

'लाडकी होणार दोडकी ?

'लाडकी बहिण' योजनेच्या 2 कोटी 34 लाख लाभार्थी

राज्य सरकारकडून 46 हजार कोटींची तरतूद

21 ते 65 वय असलेल्या महिलांना योजनेचा लाभ

महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात

कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी योजना

40 लाख लाडक्या बहीणी बोगस असल्याचं समोर आल्यानंतर आता संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय.. तर मोठ्या प्रमाणावर छाननी होणार नसल्याचं स्पष्टीकरण माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिलंय. निवडणूक प्रचारात लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 करण्याबाबत सरकारने दिलेलं आश्वासन अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पूर्ण करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यापार्श्वभुमीवर सरकार निकषाबाहेरच्या लाडक्या बहीणींची नावं वगळणार की आर्थिक तरतूद वाढवून बोगस लाडक्या बहीणींनाही समावून घेणार? याकडे लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT