Women queue up for verification under Ladki Bahin Yojana as e-KYC deadline leads to major eligibility changes. Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

Maharashtra Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर पडताळणी आणि ई-केवायसी निर्णय यामुळे तब्बल 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. आता किती लाभार्थी पात्र ठरलेत ? पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • लाडकी बहीण योजनेत 54 लाख महिला अपात्र

  • ई-केवायसी मुदत 30 एप्रिलला संपली

  • अर्जांची काटेकोर पडताळणी करण्यात आली

अखेर राज्यात 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत... राज्य शासनाने E-KYC करण्यासाठी तिसऱ्यांदा दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. गेली दीड वर्षे विविध मार्गांनी अर्जांची अचूक पडताळणीही केली जात आहे. या सर्वांतून तब्बल 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात.

महायुती सरकारने जून २०२४ मध्ये ही योजना सुरू केली. तेव्हा 2 कोटी 43 लाख महिलांनी नोंदणी केली होती. मात्र निवडणुकांनंतर जेव्हा याची काटेकोर पडताळणी झाली तेव्हा अनेकांनी निकषात बसत नसतानाही याचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. गंभीर बाब म्हणजे 2,652 सरकारी महिला कर्मचा-यांनीही योजनेचा लाभ घेत पैसे लाटलेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. 6 हजार 457 लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत 11 कोटी रुपये वसूल करण्यात आलेत. दुसरीकडे 12 हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी अर्ज करुन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलाय. चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांकडून सरकार 165 कोटी रुपये वसुल करणार आहे.

काटेकोर पडताळणी आणि ई-केवायसीनंतर आता यापुढे तरी केवळ गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र आत्तापर्यंत सरकारी तिजोरीतून लूट झाली आहे त्याला जबाबदार कोण? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली; एकाच कुंटुबातील ४ जणांचा मृत्यू

Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SRPF भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; पेपर फुटीचा मुख्य आरोपी आला समोर

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT